गणपती विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- शहरातील घरगुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनाप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत.

तसेच मूर्ती संकलन केंद्रावर आणण्यापूर्वी घरीच आरती करावी. त्यानंतर संकलन केंद्रावरच मूर्तीचे विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणपुरक साध्या पध्दतीने गणेश विसर्जन करावयाचे आहे.

भाविकांनी शक्य झाल्यास घरीच गणेशाचे विसर्जन करुन निर्माल्य इतरत्र कॅनॉल, चारी, अथवा विहिरीमध्ये टाकून न देता हे आपल्याच घर परिसरातील झाडांना, कुंड्यांना टाकावे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल.

छोटा पूल घाट बाजू, गोदावरी पेट्रोलपंपासमोर, पोलीस स्टेशनजवळ (चर्च), शनिमंदिर (टिळकनगर कॉर्नर), छत्रपती संभाजी महाराज सर्कल, माधव उद्यान, साईबाबा तपोभूमी या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र असणार आहेत.