अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. दोन्ही दुचाकी दिवसा चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते.
चोरीची पहिली घटना : मार्केटयार्डच्या मेन गेटसमोरील चहाच्या टपरीजवळ लावलेली दुचाकी (एमएच 16 सीटी 2689) रविवारी दुपारी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी बाबासाहेब अंबु बनकर (रा. कोल्हेवाडी ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीची दुसरी घटना : दुचाकी चोरीची दुसरी घटना कायनेटिक चौकातील इलाक्षी शोरूमसमोर घडली.सादीक लालासाहेब पठाण (रा. उक्कडगाव सांडवे ता. नगर)
यांची दुचाकी (एमएच 16 सीएन 9689) चोरीला गेली. पठाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.