अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. विशेषबाब म्हणजे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी घरफोड्या तर दुपारी एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
शहर, उपनगरात चोर्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. चोर्या, घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना काटवन खंडोबा परिसरातील संजयनगरमध्ये राहणारे विकास राम गवळी यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला.
13 हजार 950 रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे करीत आहेत. दुसरी घटना मोची महावीर दुकानाजवळ नमिता सुयोग निमसे (वय 23 रा. पोखर्डी ता. नगर) या खरेदीसाठी आल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्या पर्सवर चोरट्याने डल्ला मारला. या पर्समधील रोख रक्कम व मोबाईल असा 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
तिसरी घटना नेवासकर पेट्रोलपंपाशेजारील कोहीनुर मोबाईल दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 67 हजार 750 रुपये किंमतीचे मोबाईल लंपास केले.
दुकानाचे मालक फैजान मन्सुर बागवान (वय 27 रा. रामचंद्र खुंट) यांनी कोतवालीत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.