कोविडच्या लाटेचा बांधकाम व्यवसायाला फटका; ग्राहकांकडून गृह खरेदीचे निर्णय लांबणीवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कन्फेडरेशन ऑफ रीयल ईस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने तर्फे कोविडच्या दुसर्‍या लाटेचा भारतातील बांधकाम व्यवसायावर काय परिणाम झाला

याचे मूल्यमापन करण्यासाठी 24 मे ते 3 जून 2020 या कालाधीत उत्तर, पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण क्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

यात असे दिसून आलं कि, बांधकाम व्यवसायासाठी करोनाची दुसरी लाट जास्त विनाशकारी आणि दूरगामी परिणाम करणारी ठरली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून बांधकाम साहित्यावरील कर, मुद्रांक शुल्क, प्रकल्पांना त्वरित मंजुरी, कर्ज सुविधा आदी उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचा निष्कर्ष क्रेडाईच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या अत्यंत व्यापक सर्वेक्षणातून समोर आले आहे.

दरम्यान या सर्वेक्षण निष्कर्षांसंदर्भात क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पातोडिया म्हणाले, करोनाच्या दुसर्‍या लाटेने बांधकाम व्यवसायाचेच पुनर्मूल्यांकन आणि विश्‍लेषण करण्यास भाग पाडले. बांधकाम साहित्याच्या दरात नुकत्याच झालेल्या

वाढीमध्ये स्टील, सिमेंट आदींचे दर समाविष्ट असल्यामुळे बांधकामाच्या खर्चात दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले. सर्वेक्षणानूसार 85 टक्के बांधकाम व्यवसायिकांसमोर नियोजित कलेक्शन करण्याची समस्या तर 69 टक्क्यांना ग्राहकांच्या गृहकर्ज वाटपाची समस्या भेडसावते आहे.

तसेच जवळपास 95 टक्के ग्राहकांनी घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालाच्या निष्कर्षानुरुप सरकारने त्वरित आर्थिक उत्तेजन देण्यासाठी व नुकसान भरून काढण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे.

सर्व्हेक्षणानुसार 90 टक्के डेव्हलपर्सच्या मते, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट व्यवसायासाठी अधिक विनाशकारी ठरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24