क्रांती मोर्चाने ‘ हे’ तहसील कार्यालय दणादले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. भारत देशाचे ते स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. भिमा कोरेगांव येथे दंगल होत असताना पोलिस नऊ तास उशीराने घटनास्थळी आले.

भारताचे संविधानच नाहीतर आपली मुलं बाळं धोक्यात आहेत. असे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज राहुरी तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चा प्रसंगी व्यक्त केले.

भिमा कोरेगांव दंगल प्रकरणी निरपराध, विचारवंत, संविधान प्रेमी प्राध्यापक डाॅ. अनंत तेलतुंबडे व इतर १५ जणांवर खोट्या गुन्हयात संशयीत म्हणून अटक करण्यात आली. ते सर्वजण निर्दोष असल्याचे पुरावे सरकारकडे उपलब्ध असताना त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे.

यातील काही जण उच्च शिक्षित विचारवंत असून त्यांच्या लेखणीची दखल परदेशातही घेतली जाते. अशा ज्येष्ठ विचारवंतां विरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत. त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपवर व काॅम्प्युटरमध्ये खोटी माहिती व्हायरसच्या माध्यमातून सोडलेली आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये आर्सेनल या अमेरिकन कंपनीने ते निर्दोष असल्याचा अहवाल शासनास पाठवीला आहे. असे असताना त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांनी हस्तक्षेप करून त्यांना मुक्त करण्यासाठी विनंती करावी.

अशी मागणीचे निवेदन आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी घटनात्मक मानवी हक्क क्रांती मोर्चा यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या मोर्चा प्रसंगी डाॅ. जालिंदर घिगे यांनी सांगितले कि, आज संविधान महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आम्हाला गुलामगीरीतून सुटका मिळाली. आज पद प्रतिष्ठा महत्वाची नाही, जगणं महत्वाच आहे.

जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणा-या लोकांना देश द्रोहाचे गुन्हे दाखल करून तुरूंगात डांबून ठेवले. त्यांना जनावरासारखी वागणूक दिली जाते. देशाच्या संविधान बाबत आम्ही गप्प बसणार नाही. संविधानाचे पारायण करा.

घरातील मुले कलेक्टर झाल्या शिवाय राहणार नाही. यावेळी सुरेश लांबे, ॲड. भाऊसाहेब पवार, कांतीलाल जगधने, संदिप कोकाटे, नामदेव पवार, भंते करूणानंद, कुमार भिंगारे, ज्ञानेश्वर जगधने, विजय गायकवाड,

मनोज हासे, शरद संसारे, मदिना भाभी यांनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारवर कडाडून टिका केली. या प्रसंगी शिरीष गायकवाड, सत्येंद्र तेलतुंबडे, गणेश पवार, अशोक तुपे, कैलास पवार, रोहित तेलतुंबडे, विशाल कोळगे, विलास नाना साळवे आदि उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24