कृषी कन्येने शेतकर्‍यांना दिले आधुनिक शेतीचे कानमंत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी कन्या वैष्णवी सुधाकर सुंबे हिचे आगमन झाले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी या कृषिकन्येचे जोरदार स्वागत केले.

कृषी कन्या वैष्णवी हिने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतीच्या अद्यावत तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची माहिती दिली. लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय लोणी येथे वैष्णवी सुंबे ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे.

संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोगरे, प्राचार्य नीलेश दळे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक रमेश जाधव, कार्यक्रमाधिकारी प्रा. आर.ए. दसपुते, प्रा. प्रियंका दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्येने सोनेवाडी येथील शेतकर्‍यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.p

याप्रसंगी सरपंच स्वाती दिलीप सुंबे, योगेश सुंबे, सुवर्णा सुंबे, अभिषेक सुंबे, साहिल लांडे, महेश देवकर, अभिषेक राऊत, शिवम सुंबे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24