ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णालयांनी पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकिडल भागामध्ये याचा कहर जरा जास्तच आढळून येत आहे.

कोरोनाची मोठी वाढ सध्याच्या स्थितीला राहता तालुक्यात आढळून येत आहे. यातच राहता तालुक्यावर मोठे संकट ओढवले आहे. राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक आहे. एकीकडे रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतांना

ऑक्सीजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रूग्णालयांनी ऑक्सीजन आवश्यक असणारे पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले आहे. तर अन्य रूग्णांना इतरत्र हलवण्याच्या सुचना रूग्णालयांनी नातेवाईकांना दिल्या आहेत.

दरम्यान शिर्डी, कोपरगाव, राहाता येथे संगमनेर येथून ऑक्सीजन सिलींडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असुन त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे.

संगमनेर येथील रूग्णालयांनाही पुरेसा ऑक्सीजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी बाहेर ऑक्सीजन देणे थांबवले आहे.

यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रूग्णालयेच व्हेंटीलेटरवर गेली आहेत. यातील काही रूग्णांलयाकडे सायंकाळपर्यत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24