नियोजनाचा अभाव; लसीकरण केंद्रावर उडतोय गोंधळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण सुरु केल्यापासूनच प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण सोडून नुसताच गोंधळ निर्माण होत आहे.

दरदिवशी होणार हा गोंधळ पाहता प्रशासनातील नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील नागापूर लसीकरण केंद्रावर घडत असलेला पाहायला मिळतो आहे.

दरम्यान जिल्ह्यात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. शहरातील नागपूर लसीकरण केंद्रांसमोर लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.

लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. दरम्यान, करोना लसीसाठी आरोग्य केंद्राबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने उपाय शोधला होता.

ज्यांची ऑनलाईन नोंदणी होईल आणि केंद्रबाहेर लावलेल्या यादीत नाव असेल त्यांनाच लस मिळणार होती. तसा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी काढला होता.

मात्र नागपूर लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारची यादी लावलेली नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24