ताज्या बातम्या

पशूंच्या औषध साठ्याचा तुटवडा….पशुधन आले धोक्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेली काही दिवसांपासून अवकाळी पावसाने बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातच आता बळीराजाचे पशुधन देखील धोक्यात आले असल्याचे चित्र सध्या पुणतांबा परिसरात दिसून येत आहे.

पुणतांबा येथील पशुवैद्यकिय दवाखाना हा शेतकरी पशुधनासाठी अतिशय उपयुक्त ठरत असताना पशुंची औषधांचा गेल्या अनेक महिन्यापासून तीव्र तुटवडा असल्याने शेतकरी शेतमजूर यानां पशुच्या उपचारांसाठी आर्थिक फटका बसत आहे.

बळीराजासाठी शेती पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी, शेतमजूर पशुपालन करतात. सध्या दुधाला भाव नाही, शिवाय सध्याच्या वातावरणातील बदल ढगाळ हवामान थंडी या कारणानी दूध उत्पादन वाढीवर परिणाम होऊन गायीची दूध देण्याच्या क्षमतेत घट होत आहे.

तर अनेक पशु आजारी पडत आहेत. शासनाच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात औषधांचा साठा कित्येक महिन्यापासून नाही, त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी शेतमजूर यांना पशुवर उपचार करण्यासाठी खाजगी मेडिकलमधून औषधे खरेदी करावे लागत आहे.

त्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांना आर्थिक फटका बसत आहे. पशुवैद्याकीय विभागाने औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पशुपालक शेतकर्‍यांनी केली आहेत्र

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office