अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- दिपावली हा भारतातील दिव्यांचा उत्सव असुन दिपावली सुख शांती आणि समृद्धीची भरभराट घेऊन येत असते.दिपावली या सणाची लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आतुरता असते.
भारतातील प्रत्येक सण उत्सवात नाविन्यता भरलेली असते.म्हणुन भारतीय संस्कृती विदेशातील नागरिकांनाही आवडते. या दिवशी कुटुंबातील प्रत्येकजण महालक्ष्मी, देवी सरस्वती आणि देव गणेशा यांची उपासना करतात.
दिवाळी हा सण आपल्या सर्वांना आनंद, सुंख, शांती भरभराट आणि सकारात्मकतेची ऊर्जा देऊन जात असतो..!! हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला अत्यंत महत्त्व असुन हा सण.
हा सण आनंद सुख शांती भरभरानवं स्वप्नांना सकारात्मकतेची ऊर्जा देणारा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार ही दिवाळी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच कार्तिक अमावास्या गुरूवार 4 नोव्हेंबर 2021 या शुभ दिवशी आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी दिपावलीला बुध, सुर्य, मंगळ आणि चंद्र एकाच राशीत येणार असुन,तूळ राशीमध्ये या चार ग्रहांचा मुक्काम शुभ फळदायी ठरणार आहे
सूर्याला ग्रहांचा राजा म्हणुन ओळखले जाते मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणुन संबोधितात,बुध ग्रहांचा राजकुमार आणि चंद्रमा मनाचा कारक मानला जातो. यांमुळे महालक्ष्मी मातेच्या धनसंपदा या आशिर्वादाची पु्थ्वीतलावावर पुष्परूष्टी असणार आहे.
दिपावली लक्ष्मीपुजन शुभ चौघडा वेळ मुहूर्त :-
शुभ पहाटचा मुहूर्त :- 06:34:53 ते 07:57:17
शुभ सकाळी मुहूर्त :- सकाळी 10:42:06 ते 14:49:20
शुभ संध्याकाळी मुहूर्त :- 16:11:45 ते 20:49:31
शुभ रात्रीचा मुहूर्त :- 24:04:53 ते 01:42:34