नगर शहराचा युवा शिक्षक ललित वाकचौरे ठरला ‘ग्लोबल’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- भारताने जागतिकीकरण स्वीकारणे आणि भारताच्या बुद्धीचा जगाला देखील उपयोग होऊ लागला अनेक देशांमध्ये विविध पातळीवर करार होऊ लागले.

त्यातच भारत-बांगलादेश टेली कॉलाबोरेशन संदर्भातील करार झाले या करारामध्ये नगर शहरातील व सध्या नाशिक जिल्हा परिषद येथे कार्यरत असलेले युवा तंत्रस्नेही शिक्षक श्री ललित बाळासाहेब वाकचौरे यांचादेखील महत्त्वाचा वाटा आहे.

यांनी या बरोबरच बांगलादेशी शिक्षकांना ध्यान -प्राणायम याचे देखील प्रशिक्षण देऊन तनावमुक्तीचा अनुभव दिला.भारत देश युनोच्या शाश्वत विकासाच्या ध्येयात आरोग्य या विषयासाठी मोलाचे काम करू शकतो असे प्रतिपादन केले.

इको ट्रेनिंग सेंटर स्वीडन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद नाशिक यांच्या द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय टॅली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट एप्रिल 2021पासून सुरू आहे महाराष्ट्र सरकार शासकीय व स्वयंसेवी शिक्षक संघटना

यांच्या संयुक्त विद्यमाने या देशातील निवडक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला यात भारतातून 100 तर बांगलादेशातून शंभर शिक्षक तसेच 500 विद्यार्थी सहभागी आहे.

भारत व बांगलादेशातील सहभागी शिक्षकांनी आपापल्या देशातील सांस्कृतिक औद्योगिक ऐतिहासिक व शैक्षणिक माहितीचे प्रेझेन्टेशन, फोटो व्हिडिओ च्या सहाय्याने आदान-प्रदान केले युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन च्या ठरवून दिलेल्या

17 शाश्वत विकासाच्या ध्येय बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून 17 ध्येयं पेकी भूक निर्मूलन,दारिद्र्य निर्मूलन,चांगले आरोग्य,गुणवत्तापूर्ण शिक्षण,शुद्ध पाण्याची उपलब्धता,

सांडपाण्याची व्यवस्था असमानता कमी करणे, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोळा ऑनलाइन सेशन पद्धतीने आयोजन करण्यात आले व प्रकल्प पूर्ण करण्यात आला या प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक नाशिक डाएट चे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. योगेश सोनवणे

यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. हा प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल मा. प्राचार्य श्री बाळासाहेब वाकचौरे (वडील) ,तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुनील पंडित , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शिंदे तसेच राजापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. जाधव साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड आदी मान्यवरांनी कौतुक केले.

अहमदनगर लाईव्ह 24