अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे.
यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
२६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पारितोष छबनराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिक पोलिसांचा कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे.