जमिनीचा वाद ! 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जमिनीवरून झालेल्या वादातून 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे घडली आहे.

दरम्यान यातील 3 आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली. तर कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह 9 आरोपी पसार झाले आहेत.

याबाबत अधीक माहिती अशी कि, कोथूळ येथील रोहिदास गबाजी धस यांची शेतजमीन दीड वर्षांपूर्वी इसार पावती करून फिर्यदीने विकत घेतली. ती जमीन रोहिदास व भरत धस यांनी परस्पर दीपाली मनोहर लाटे, सोनाली धनंजय लाटे यांना विकली.

याबाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा चालू आहे. गुरुवारी (दि. 23) सकाळी 9 वा. मनोहर सुधाकर लाटे, धनंजय सुधाकर लाटे, सुधाकर पांडुरंग लाटे, मिरा सुधाकर लाटे, सुभाष बापुराव लाटे, लक्ष्मण भगवान लाटे (रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), रोहिदास गबाजी धस,

विलास रघुनाथ धस, बाळू रघुनाथ धस, संजय हरिभाऊ धस, कैलास हरिभाऊ धस, मारुती किसन सातपुते, नवनाथ मारुती सातपुते (रा. घाटकोपर, मुंबई) यांनी शेतात येऊन फिर्यादीच्या सासू, सासरे व मुलाला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोथूळ सेवा संस्थेचे चेअरमन धनंजय लाटे यांच्यासह 12 जणांवर विनयभंगासह,

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24