अनलॉक होताच मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अत्यावश्यक सेवा वगळता तब्बल सव्वा दोन महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली राहुरीची बाजारपेठ सोमवारी सकाळी खुली झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली.

शहरातील बाजारपेठ तसेच नगर-मनमाड राज्य महामार्गावरील दुकानात जमलेली गर्दी पाहता राहुरीकरांना कोरोनाची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट झाले.

अनलाॅकचा निर्णय होताच सोमवारी राहुरी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. शहरातील बाजारपेठेत तसेच नगर-मनमाड राज्य महामार्गावरील मोठ्या किराणा दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. लाॅकडाऊन हटवण्यात आल्याने

खबरदारीचा उपाय म्हणून मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.

दुपारपर्यंत ८० व्यावसायिकांच्या तपासणीत एकही बाधित न आढळल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. तपासणी पथकात महेंद्र तापकिरे,

काकासाहेब शिरसाठ, सुनील कुमावत, राजू खंगले, एकनाथ जगधने, रवींद्र सरोदे, रकटे, ज्ञानेश्वरी तंटक, आलम शेख यांचा सहभाग होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24