सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ… सावधान अन्यथा फसवणुकीच्या जाळ्यात सापडाल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सण उत्सवांचा काळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरु होत असते.

यातच आजकाल ऑनलाईन शॉपिंगकडे नागरिकांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे वेगवेळ्या इ कॉमर्स साईट्सवर भेट देत ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात.

मात्र सावधान ऑफर्सच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे अशावेळेस सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

उत्सव काळात तर या खरेदीचा मोठा जोर वाढतो. सणाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे.

विविध वस्तूंवर ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलत योजना (स्किम) जाहीर करून लिंक पाठविल्या जातात. या माध्यमातून वस्तू मिळत नाहीच, मात्र बँक अकाऊंट साफ होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे खात्री करूनच ऑनलाईन शॉपिंग करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

अशी होऊ शकते फसवणूक – फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली मोबाईलवर बनावट लिंक पाठवून त्यावर सावज हेरले जाते. खात्री न करता जर या लिंकवर क्लिक केले की, तुम्ही आमचे बेस्ट ग्राहक आहात, कंपनीने तुमची निवड केली आहे, असे सांगून गंडा घातला जातो.

ही काळजी घ्या- ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगा. आवडलेली वस्तू ऑर्डर करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा. एखादी वस्तू आवडल्यास विश्वासार्ह ॲपवरून खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी साईटचीही खात्री करा.

Ahmednagarlive24 Office