अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यामध्ये पोलीस पथकाने दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहा हत्यारे हस्तगत केली. यामध्ये सात गावठी कट्टे, तलवारी व जिवंत काडतुसे यांचा समावेश असून याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधीक्षक पाटील म्हणाले की, दोन दिवस पोलीस पथकाने या तीन तालुक्यांमध्ये 82 ठिकाणी छापा टाकून हत्यारे हस्तगत केलेली आहेत. आरोपींमध्ये अशोक लष्करे रा.नेवासा फाटा, रितेश साळवे रा. नेवासा, शुभम गर्जे रा. नेवासा, लक्ष्मण अडांगळे रा.गंगानगर तालुका नेवासा, शहरुख युनुस पटेल रा. श्रीरामपूर,
किरण धोत्रे रा.बाजारतळ श्रीरामपुर, अनिल इरले रा.देवळाली प्रवरा तालुका राहुरी, कैलास धोत्रे रा. देवळाली प्रवरा राहुरी,काशिनाथ शिंदे रा. नगर, शाहरुख शेख रा. घोडेगाव तालुका नेवासा, सिद्धार्थ पठारे रा.गंगापूर, कैलास राजू धोत्रे रा.देवळाली प्रवरा, मयूर दीपक तावर रा. श्रीरामपूर यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा यामध्ये समावेश आहे.
अधीक्षक पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये गावठी कट्टयाचा विषय हा मोठ्या प्रमाणावर आहे. या अगोदर सुद्धा राज्याच्या सीआयडी अहवालामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कट्टे असून हस्तगत केलेल्यांची संख्या सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.
या कारवाईची गुप्तता राहावी, याकरिता पोलिसांनी गेल्या दोन दिवसापासून नेवासा, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यामध्ये हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. 82 गुन्हेगारांच्या घराच्या झडत्या घेण्यात आलेल्या आहेत. या आरोपिंच्या ताब्यातून सात गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे व तीन तलवारी असा एकूण दोन लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये या तीन तालुक्यांमध्ये या अगोदर विविध प्रकारचे गावठी कट्ट्याच्या संदर्भातील गुन्हे दाखल होते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर आम्ही या तीन तालुक्यांचा सर्च घेतलेला आहे. या पुढील काळात सुद्धा अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
जे आरोपी पकडलेले आहेत. त्यांच्यावर याअगोदर अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच पकडलेले काही आरोपी हे वाळूतस्करांची निगडीत असावेत असा अंदाज आहे. मात्र जे आरोपी पकडले आहेत. त्यांच्यावर या अगोदर गुन्हे दाखल असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोनि अनिल कटके, रणजित डेरे, मसूद खान, विजय करे,संजय सानप, नंदकूमार दुधाळ,सोमनाथ दिवटे, रामचंद्र करपे, सचिन बागूल, गणेश इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील २५ पोलीस उपनिरीक्षक व ३५० पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले होते.