अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.
त्यानंतर त्यांचे पार्थिव आज दुपारी ४ वाजता नगरला त्यांच्या निवास स्थानी आणण्यात आले. तेथून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली.
सायंकाळी ६ च्या दरम्यान नगर च्या अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर दिलीप गांधी अमर रहे च्या घोषणात, भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेच्यावेळी संपूर्ण रस्त्यात त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.दिलीप गांधी यांच्या निवासस्थाना पासून आनंदधाम,बंगाल चौक,दिलीप गांधी यांचे जुने निवास स्थान (चांद सुलतान शाळे जवळ), माणिक चौक ,
अर्बन बँक , कापड बाजार, तेली खुंट , नेता सुभाष चौक, गांधी मैदान येथील भाजप कार्यालय, पटवर्धन चौक, मार्गे अंत्ययात्रा निघाली होती. दरम्यान चाहत्यांनी अमर रहे.. अमर रहे.. गांधी साहब अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा,
गांधी साहेब नाम रहेगा अशा घोषणा दिल्या. अंत्य यात्रा मार्गावर चाहत्यांनी अभिवादन करुन दर्शन घेतले. यावेळी संभाजी कदम , भगवान फुलसौंदर, महापौर.
बाबासाहेब वाकळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, आदींसह भाजप चे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद गंधे,खासदार सुजय विखेपाटील, व अन्य मान्यवर उपस्थित होते.