अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील अक्कलवाडी येथील लष्करी सेवेत असणारा जवान प्रतिक बाबाजी ढोकळे ( वय २३ ) याचे अपघातानंतर पुण्याच्या लष्करी रूग्णालयात उपचार सुरू असताना
गुरूवारी निधन झाले त्याच्यावर अक्कलवाडीत शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते जम्मू येथे लष्करी सेवेत असलेला
प्रतिक सुट्टीसाठी महिनाभरापूर्वी गावी आला होता आठवड्यापुर्वी रांधे येथे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. पुण्याच्या लष्करी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते
परंतु उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहिण असा परिवार आहे.