लता मंगेशकर यांनी मागे सोडली ‘इतकी’ कोट्यवधींची संपत्ती…..वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-   भारतीय स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोरोणा बाधित आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीत जगामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे जाणून घेऊया पुढे.

त्यांची पहिली कमाई होती २५ रुपये – मीडिया रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पहिल्यांदा संगीत जगामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची पहिली कमाई २५ रुपये होती.

त्यांची जीवनशैली अगदी साधी होती पण त्यांच्याकडे गाड्यांचा मोठा संग्रह होता. रिपोर्ट्सनुसार, लता दीदींची एकूण संपत्ती ३७० कोटी रुपये होती. त्यांची बहुतेक कमाई त्यांच्या गाण्यांच्या रॉयल्टीतून आली आहे.

याशिवाय त्यांनी बरीच गुंतवणूकही केली होती. त्या दक्षिण मुंबईतील पॉश भागातील पेडर रोडवर असलेल्या प्रभु कुंज भवनात राहत होत्या.

त्यांना गाड्यांचा छंद होता – मंगेशकर यांच्याकडे गाड्यांचा मोठा संग्रह होता, कारण त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये उत्तम आणि स्टायलिश गाड्या ठेवण्याची आवड होती.

मंगेशकर यांनी फार पूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना गाड्यांची खूप आवड आहे. त्यांनी पहिल्यांदा शेवरलेट कार (Chevrolet car) खरेदी केली होती.

ही कार त्यांनी इंदूरहून घेतली असून ती कार त्यांनी आईच्या नावावर घेतली होती. यानंतर त्यांच्या गॅरेजमध्ये एक Buick कार आली. तसेच त्याच्याकडे Chrysler कारही होती.

यश चोप्रांनी भेट म्हणून त्यांना दिली मर्सिडीज – लता दीदींना यश चोप्रांनी एक मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “दिवंगत यश चोप्रा जी मला त्यांची बहीण मानत होते

आणि मला खूप आपुलकी द्यायचे. ‘वीरझारा’चे संगीत रिलीज झाले तेव्हा त्यांनी मर्सिडीजची चावी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले की ही कार मला भेट म्हणून देत आहे.

माझ्याकडे अजूनही ती कार आहे.” असे लता मंगेशकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्यांचा निधनाने सोशल मीडिया झाली सुन्न सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते आणि सेलिब्रिटींना धक्का बसला आहे.

लता मंगेशकर यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. तसेच चाहत्यांचे डोळे ओले झाले असून, आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहेत. लता मंगेशकर यांचा मधुर आवाज त्यांच्या चाहत्यांच्या कानात गुंजतोय. आता हा आवाज कायमचा शांत झाला आहे.