WhatsApp 3D Avatar Feature : व्हॉट्सॲपचे आणखी एक फीचर लाँच! सेट करता येणार 3D प्रोफाइल फोटो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp 3D Avatar Feature : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण व्हॉट्सॲपने पुन्हा एक जबरदस्त फीचर आपल्या वापरकर्त्यांसाठी आणले आहे.

यामध्ये वापरकर्त्यांसाठी 3D मध्ये प्रोफाइल फोटो सेट करता येणार आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती, त्या फीचर्सप्रमाणे हेही फीचर धुमाकूळ घालेल हे निश्चितच आहे.

WhatsApp 3D अवतार प्रोफाइल फीचर

या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाइल फोटोला एक नवीन रूप देता येईल. हे लक्षात घ्या की वापरकर्त्यांना फक्त प्रोफाईल फोटो बदलण्याची संधी मिळत नसून त्यासोबतच चॅट स्टिकर्सची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे चॅटिंग दरम्यान वापरकर्ते आपला अवतार स्टिकरमध्ये रूपांतरित करून पाठवू शकतील.

असे करेल काम

या फीचरचा वापर कसा करायचा असेल प्रश्न अनेकांना पडला असेल. तुम्हाला तुमचा WhatsApp वर अवतार दोन प्रकारे तयार करता येईल. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या हेअरस्टाईल, आउटफिट्स आणि चेहऱ्याच्या फीचरचा पर्याय मिळत आहे.

यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भावना आणि कृतींमध्ये तुमचा अवतार दर्शवणारे स्टिकर्स तयार करू शकता. यामध्ये 36  सानुकूल अवतार स्टिकर पर्यायांचा समावेश आहे. तुम्ही तुमचा 3D अवतार स्टिकर म्हणून पाठवू शकता. त्याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो म्हणून अवतार सेट करू शकता.

या प्लॅटफॉर्मवर अगोदरपासूनच उपलब्ध

हे नवीन अगोदरपासूनच मेटाच्या इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच Instagram आणि Facebook वापरकर्त्यांना हे फीचर अगोदरपासूनच वापरता येत आहे. अशातच आता हे फीचर व्हॉट्सपवर देखील आणले आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग याची ओळख करून देताना की, तो व्हॉट्सपवर अवतार आणत आहे, ज्याचा वापर तुम्ही चॅटमध्ये स्टिकर्स म्हणून करू शकता.

दरम्यान, व्हॉट्सॲप सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. व्हॉट्सॲपचे सर्व फीचर्स वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरतात. हेही फीचर्स वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरेल.