ताज्या बातम्या

Oppo A78 5G : लाँच होतोय ओप्पोचा नवीन स्मार्टफोन लाँच, लीक झाली माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Oppo A78 5G : ओप्पोचे जवळपास सर्वच स्मार्टफोन मार्केटमध्ये चांगले धुमाकूळ घालत आहेत. त्यात कंपनी सतत नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते.

अशातच कंपनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात आणखी एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. लवकरच कंपनी आता Oppo A78 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे.

हा स्मार्टफोन Oppo A78 5G भारतात 14 जानेवारी 2023 रोजी लॉन्च होईल. फोनचा एक फोटोही लीक झाला असून रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, Oppo A78 5G सह डायमेंसिटी 700 प्रोसेसर उपलब्ध असेल. याशिवाय Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो.

यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असणार आहे.

रिपोर्टनुसार, फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध तर Android 13 आधारित ColorOS 13.0 उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 18,500 ते 19,000 रुपये असू शकते.

Oppo ने गेल्या वर्षी थायलंड मध्ये Oppo A77 5G लाँच केले होते पण ते अजून भारतीय बाजारात सादर केलेले नाही. Oppo A77 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz इतका आहे.

Ahmednagarlive24 Office