Lava Blaze Pro 5G : स्टायलिश लूक आणि शानदार फीचरसह लवकरच लाँच होणार ‘हा’ 5G फोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Lava Blaze Pro 5G : बाजारात आता 5G स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. त्यापैकी काहींच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्ही कमी किमतीत शानदार 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे.

लवकरच भारतीय बाजारात Lava Blaze Pro 5G हा फोन लाँच होणार आहे. ज्याची किंमत 15 हजारांपेक्षा कमी असणार आहे. ज्यात तुम्हाला 50MP कॅमेरा आणि प्रीमियम डिझाइन मिळेल. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

कंपनीचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने नुकताच Lava Blaze 2 Pro 4G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. आता त्याचा 5G प्रकार सादर करण्यात येईल. विशेष बाब म्हणजे या फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. त्यावर विशेष सवलत मिळू शकते.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने Lava Blaze Pro 5G च्या लॉन्चची तारीख आणि उपलब्धतेशी संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. या फोनचे मुख्य वैशिष्ट्य अजूनही समोर आले नाही. येत्या काही आठवड्यांत हा फोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन 5G मॉडेल प्रत्येकाच्या रेंजमध्ये असेल.

शेअर केला फोनचा पहिला फोटो

Lava 5G डिव्‍हाइस लॉन्‍च होण्‍यापूर्वी, टिपस्‍टर अभिषेक यादवने या फोनचे रेंडर,फोटो आणि मुख्य तपशील देखील शेअर केले आहेत. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर असणार आहे. या फोनमध्ये दुय्यम सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह 50MP मुख्य कॅमेरा असेल. लीक झालेल्या फोटोमध्ये फोनचे ग्रेडियंट डिझाइन पाहायला मिळत आहे आणि तो पांढर्‍या/सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

नुकतेच लाँच झालेल्या Lava Blaze 2 Pro 4G मध्ये 6.5Hz रिफ्रेश रेटसह 90Hz डिस्प्ले शिवाय त्यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. यात मागील पॅनलवर 50MP मुख्य सेन्सर पाहायला मिळेल. ज्यासह 2MP क्षमतेचे दोन लेन्स उपलब्ध असून स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Unisoc T616 प्रोसेसर दिला आहे. 5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग असणाऱ्या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.

Ahmednagarlive24 Office