Lava X3 : इतक्या स्वस्तात लाँच होणार Lava X3, मिळणार जबरदस्त फीचर्स; समोर आली माहिती

Lava X3 : Lava च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपल्या चाहत्यांना लवकरच मोठे गिफ्ट देऊ शकते. कंपनी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Lava X3 लाँच करण्याच्या तयारीत आहे.

परंतु, हा स्मार्टफोन लाँच होण्याअगोदरच Lava X3 चे स्पेसिफिकेशन आणि डिझाइनची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी 4,000 mAh बॅटरी देईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अपेक्षित किंमत

कंपनीने अद्यापही अधिकृतपणे फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत जाहीर केलेली नाही, मात्र, हा फोन 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल असा दावा Anvin नावाच्या टिपस्टरने ट्विटरवर केला आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन ग्रीन, आर्क्टिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल.

संभाव्य स्पेसिफिकेशन

टिपस्टर मुकुल शर्माच्या मते, हा स्मार्टफोन Android 12 Go Edition सह सादर केला जाऊ शकतो. फोनला 6.5-इंचाचा HD Plus IPS डिस्प्ले आणि 2GHz MediaTek Helio प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. स्टोरेजचा विचार केला तर 32 GB पर्यंत स्टोरेज फोनमध्ये 3 GB पर्यंत RAM सह उपलब्ध असेल. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल.

कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 8 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा सेन्सर आणि AI दुय्यम कॅमेरा उपलब्ध असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा तर मागील कॅमेरासह एलईडी फ्लॅश लाईटचा सपोर्ट असेल. तसेच मागील बाजूस सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल.

या स्मार्टफोनला 4,000 mAh बॅटरीचा सपोर्ट मिळेल. इतर कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसाठी सपोर्ट मिळेल.