कर्जतमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या होऊ लागल्या चोऱ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक आणि दरोड्यांच्या घटनांचा आलेख चढतच आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना कर्जत तालुका देखील यामध्ये मागे राहिलेलं नाही आहे.

गेल्या काही महिन्यापासून कर्जत तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

ग्रामीण भागामध्ये सकाळची कामे आटोपल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य कामासाठी दिवसभर शेतात जातात. या कालावधीत पाळत ठेवून चोरट्यांकडून घरफोडीचे प्रकार केले जात आहेत.

चोरटे घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे घरात प्रवेश करून ऐवज लंपास करत असल्याचे प्रकार वाढलेले आहेत. जिल्ह्यात फक्त खून आणि खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे वाढले नसून, वाहनचोऱ्या, दिवसा आणि रात्रीच्या घरफोड्या,

फसवणूक आणि बलात्काराच्या घटना देखील वाढताना दिसत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि बलात्काराच्या घटना उघडकीस येण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. मात्र, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी आणि फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24