कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच शहरातील एमआयडीसी परिसरात चोरटयांनी एका दुकानावर हात साफ केला आहे.

चोरटयांनी दुकानाच्या दरववाजावाटे आत प्रवेश करुन दुकानाचेे काउंटर उचकटुन आतील पाच हजार रुपये चोरुन नले. हि घटना नगर मनमाड रोड लगत हॉटेल अंबिका स्वीट शेजारी असलेल्या वेदांत स्टील दुकानात घडली आहे.

याबाबतची अधिक सविस्तर माहिती अशी की, पप्पू दिनकर बडे (वय 32, रा.पितळे कॉलनी, नागापूर ) यांचे मनमाड रोडवरील हॉटेल अंबिका स्वीट शेजारी वेदांत स्टील नावाचे दुकान आहे.

एके दिवशी रात्रीच्या सुमारास अज्ञाच चोरानी दुकानाच्या दरवाजावाटे आत प्रवेश केला. यावेळी चोरटयांनी दुकानाातील काऊंटर उचकटुन आतील पाच हजार रुपये चोरुन नेले.

दरम्यान याप्रकरणी पप्पू बडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसांनी गुन्हयाची नोंंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक दाताळ करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24