अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मोक्का, खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सोडून दिला जातो. त्याच्याविरुद्ध पिंपरी येथे ‘मोक्का’ची झाल्याची माहिती नव्हती, असा हास्यास्पद बचाव केला जाऊ लागला आहे.
घावटे प्रकरणावरुन ‘एलसीबी’ चांगलीच संशयाच्या फेऱ्यात अडकली असून, हे प्रकरण जिल्हा पोलिस दलाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. असे असतानाही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा खटाटोप करीत आहेत.
नगर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिसांकडे अनिल उर्फ बबन घावटे याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सराईत आरोपीने यापूर्वी पोलिसांवर हल्ला केला होता. वाळूतस्करीची माहिती पोलिसांना कळविल्याच्या संशयावरुन त्याने एका व्यक्तीवर खुनी हल्ला केला होता.
त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निगडी पोलिसत त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी सराईत असल्याने घावटे याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्कातील फरार आरोपी घावटे हा श्रीगोंदा तालुक्यात फिरत असल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने घावटे याला ताब्यात घेतले. पकडून त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.
तेथे कटके यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले. त्यानंतर काही ‘डीलिंग’ झाले. त्यानंतर त्याला चक्क सोडून देण्यात आले. यामध्ये खूप मोठी आर्थिक ‘अर्थ’पूर्ण उलाढाल झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून मोक्कातील आरोपी सोडून देण्याच्या धक्कादायक प्रकार घडला. पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोक्कातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी सोडून देणे हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.
परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांवर कारवाई करण्याची नामुष्की ओडवणे हे पोलीस अधीक्षक याना परवडणार नाही म्हणून हे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथे त्याच्याविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई झालेली असल्याची माहिती नव्हती.
कोणत्या आरोपी विरुद्ध राज्यात कोठे कोणते गुन्हे दाखल आहे याची माहिती CCTNS प्रणाली वर कळते परंतु त्याच्याविरुद्ध त्याला तपासात आरोपी केल्याने त्याची माहिती नव्हती असा हास्यास्पद बचाव केला जाऊ लागला आहे हे प्रकरण कशी दडपवता येईल यासाठी खटाटोप चालू आहे परंतु या प्रकरणावरून पोलीस प्रशासन चांगलेच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.
ज्या क्रमांकाचे लोकेशन घेतले त्याच क्रमांकावरून ‘डीलिंग’ झाले :- पोलिसांकडून सोडून दिले जावे, यासाठी ज्या क्रमांकावरून घावटे याने त्याच्या हस्तकांसोबत संपर्क करून ‘अर्थ’पूर्ण उलाढाल केली. त्याच क्रमांकाच्या लोकेशनवरून घावटे याला पकडण्यात आले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयात आणल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे.असे असताना बचावाचा कोणताही मार्ग उरला नाही, हे ओळखून आता हास्यास्पद बचाव सुरू केला आहे.
एलसीबीला वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालून त्यांचा बचाव करण्याचा खटाटोप करीत आहे. सर्व माहिती उपलब्ध असतानाही केवळ प्रकरण दडपडायचे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पक्के ठरवले असल्याने पुरावे उपलब्ध असतानाही निष्पक्ष चौकशी केली जात नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.