गेल्या आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास 1 टक्क्यांनी घसरले. तर अनेक शेअर्सनी उत्तम परतावा दिला आहे. गेल्या आठवडय़ात एका शेअरने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचे पैसे 1 आठवड्यात दुप्पट झाले आहेत. जाणून घेऊया अशाच टॉप 5 शेअर्सबद्दल की ज्यांनी गुंतवणूक दारांना मालामाल केले आहे.
Sujala Trading : आठवडाभरापूर्वी हा शेअर 18.76 रुपयांवर व्यवहार करत होता. हा शेअर आता 39.21 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. अशा प्रकारे गेल्या आठवडय़ात या शेअरने 109.01 टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिला आहे.
FAZE THREE Autofab :
आठवडाभरापूर्वी या शेअरची किंमत 67 रुपये होती. या शेअरची किंमत आता 112.87 रुपये झाली आहे. अशा प्रकारे गेल्या आठवडय़ात या शेअरने 68.46 टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिला आहे.Samrat Forgings : आठवडाभरापूर्वी या शेअरचा भाव 344.50 रुपये होता. हा शेअर आता 550 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशा प्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यात सुमारे 59.65 टक्के परतावा दिला आहे.
E-Land Apparel :
आठवडाभरापूर्वी ई-लँड अपैरलच्या शेअरची किंमत 6.06 रुपये होती. या शेअरची किंमत आता 9.54 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यात सुमारे 57.43 टक्के परतावा दिला आहे.Chandni Machines : आठवडाभरापूर्वी या शेअरची किंमत 16.35 रुपये होती. या शेअरची किंमत आता 25.64 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यात सुमारे 56.82 टक्के परतावा दिला आहे.
टीप: शेअर्सच्या परताव्याची माहिती येथे दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही.