अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) पॉलिसीबद्दल कोणत्याही माहितीसाठी आत्तापर्यंत तुम्हाला एजंट्सकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला पॉलिसीशी संबंधित माहिती केवळ एका कॉलमध्ये मिळणार आहे.
अशी असणार आहे प्रक्रिया…
1. सर प्रथम एलआयसीच्यावेबसाइट www.licindia.in वरजाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल.
2. यानंतर तुम्ही होम पेजच्या कस्टमर सर्व्हिस नावाची कॅटगरीवर क्लिक केल्यावर तुमहाला सब-कॅटगरी दिसतील.
3. आता तुम्ही या कॅटगरीमध्ये ‘अपडेट युवर कॉन्टॅक्ट डिटेल्स’ या ऑप्शनवर क्लिक करा.
4. आता तुम्ही नवीन पेजवर जाल. या पेजवर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा.
5. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला डिक्लेरेशनबद्दल विचारले जाईल आणि त्यावर YES केल्यानंतर, राइट क्लिक करा आणि सबमिट करा.
पॉलिसी डिटेल्स देणे गरजेचे…
1. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही विद्यमान एलआयसी ग्राहक असल्यास, तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक विचारला जाईल.
2. येथे तुमचा पॉलिसी नंबर टाकल्यानंतर, व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्सवर क्लिक करा आणि पॉलिसी नंबर व्हेरिफाय करा.
3. या प्रक्रियेनंतर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल अधिकृत वेबसाइटवर अपडेट केला जाईल.
4. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एलआयसी पॉलिसी, कोणतीही नवीन पॉलिसी किंवा जुन्या पॉलिसीमधील कोणत्याही अपडेटशी संबंधित सर्व माहितीबद्दल नोटिफिकेशन येतील.