अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-सध्या देशभरातील नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत आहेत.
पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर दिवसेंदिवस आर्थिक भार वाढत आहे. मात्र आता चिंताच सोडा कारण आज आम्ही आपल्यासाठी अशी एक बाईक घेऊन आलो आहे,
जी तुम्हाला अवघ्या काही रुपयांमध्ये दूर प्रवासाचा टप्पा पार करण्यास मदत करेल… प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.
वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी Atumobiles Pvt Ltd ने एक शानदार आणि किफायतशीर इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक बाईकचा वापर करुन तुम्ही केवळ 7 ते 8 रुपयांच्या किंमतीत 100 किमीपर्यंतचा प्रवास करू शकता.
जर तुम्ही सामान्य पेट्रोल बाईक किंवा स्कूटर्सचा विचार केलात तर 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 120 ते 150 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे ही इलेक्ट्रिक बाईक इतर बाईक्सच्या तुलनेत बेस्ट ठरते.
जाणून घेऊया या बाईकचे आकर्षक फीचर्स :-
Atumobiles Pvt Ltd ने गेल्या वर्षी अॅटम 1.0 (Atum 1.0) ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात सादर केली होती. या बाईकची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते.
लॉन्च झाल्यापासून या बाईकला आतापर्यंत 400 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत, त्याचबरोबर या बाईकची डिलिव्हरी देखील सुरू करण्यात आली आहे.