लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शेकडो मुलं दरवर्षी साहेब होत असतात. कोणी फौजदार बनतात अगदी तळागाळातील, खेड्या पाड्यावर राहणारे मुलं स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे साहेब होतात.

या उत्तीर्ण झालेल्या भावी फौजदाराची भव्य मिरवणूक देखील काढली जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक मुलगा फौजदार बनण्याच स्वप्न उराशी बाळगतो, पालकांना देखील आपला मुलगा मोठा साहेब व्हावा अशी इच्छा असते.

पुणे जिल्ह्यातील (Pune District) आंबेगाव तालुक्याच्या एका शेतकरी बापाने देखील आपल्या मुलाने स्पर्धा परीक्षा सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण व्हावे आणि फौजदार बनाव असं स्वप्न बघितलं आणि या शेतकरी बापाच्या स्वप्नांवर खरे उतरले (Nilesh Barve) निलेश बर्वे.

या शेतकरी पुत्राने फक्त आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली असं नाही तर एमपीएससी परीक्षेत (MPSC) प्रथम स्थान मिळवले. यामुळे शेतकरी बापाचा आनंद द्विगुणित झाला आणि आनंदअश्रू घळाघळा वाहू लागले.

निलेश यांनी एमपीएससीचा (MPSC Exam Result) खडतर प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून फौजदार पद पटकावलं. एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या ग्रुप बी च्या परीक्षेचा (Mpsc Group B) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षा अंतर्गत पीएसआय (PSI) पदाचा निकाल या दिवशी लागला.

या पीएसआयच्या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मौजे चोस येथील शेतकरी पुत्र निलेश बर्वे (PSI Nilesh Barve) राज्यात प्रथम आला. निलेश यांनी आपल्या शेतकरी पित्याचे स्वप्न साकार केले आणि शेतकरी पित्याने व त्यांच्या आप्तेष्टांनी निलेश यांनी दिलेला हा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला.

निलेश यांना अगदी लहानपणापासून शिक्षणाचे वेड होते, निलेश शिक्षणात नेहमीच अव्वलस्थानी असत. त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अवसरीच्या सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळवला आणि येथून आपले मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केले.

2013 साली निलेशने आपली पदवी पूर्ण केली पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण पंढरी पुण्यात एका खाजगी अभ्यासिकेत समन्वयक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. निलेशने रोजाना बारा तास अभ्यास केला. रोज मित्रांसमवेत तीन तास चर्चासत्र घेतले. निलेशने पीएसआय पदा समवेतच राज्यसेवेचा देखील अभ्यास सुरू केला होता.

निलेश यांनी परीक्षेत तीन वेळा मुख्य परीक्षा पास केली मात्र, यश काही गावलं नाही. अखेर 2019 निलेश च्या स्वप्नपूर्ती चे वर्ष उजाडले, यावर्षी आपल्या कष्टाला अजूनच धार दिली कष्टाची पराकाष्टा केली आणि शेतकरी बापाने बघितलेले स्वप्न सत्यात उतरवलं.

निलेश यांनी यावेळी सांगितले की, पीएसआय फौजदार झालो म्हणून मी थांबणार नाही मी राज्य सेवेचा अभ्यास करीन आणि उपजिल्हाधिकारी पद प्राप्त करून आपल्या पित्याची आणि आजोबांची स्वप्नपूर्ती करेन.