ताज्या बातम्या

Lenovo Yoga 9i : लेनोवोच्या 2 in 1 लॅपटॉपमध्ये मिळत आहे शक्तिशाली प्रोसेसर, किंमत आहे फक्त इतकीच..

Published by
Ahmednagarlive24 Office

Lenovo Yoga 9i : लेनोवोने आज Yoga 9i या सीरिजअंतर्गत Lenovo Yoga 9i Gen 8 हा लॅपटॉप भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या 2 in 1 लॅपटॉपमध्ये 4K टच स्क्रीन आणि शक्तिशाली प्रोसेसर आपल्या वापरकर्त्यांसाठी दिला आहे.

त्याशिवाय या लॅपटॉपची बॅटरी 14 तास चालेल, असा दावाही कंपनीने केला आहे. जाणून घेऊयात या लॅपटॉपची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स काय आहेत?

किती आहे किंमत

या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1,74,990 रुपये इतकी आहे. जर तुम्हाला हा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तो लेनोवोच्या अधिकृत साइटवरून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हा लॅपटॉप 29 जानेवारीपासून Lenovo Exclusive Store आणि Amazon India वरून खरेदी करता येईल. तसेच हा लॅपटॉप स्टॉर्म ग्रे आणि ओटमील या दोन रंग पर्यायांमध्ये येतो.

काय असणार स्पेसिफिकेशन

Lenovo च्या या लॅपटॉपला Windows 11 Pro ऑनबोर्ड मिळतो. तसेच तो 14-इंच OLED PureSight 4K स्क्रीनसह येतो जो 3,840×2,400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि टचस्क्रीनला सपोर्ट करतो.

डिस्प्लेसह 60Hz रिफ्रेश रेट, 400 nits ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्ट आहे. Lenovo Precision Pen 2 या लॅपटॉपसोबत बॉक्समध्ये उपलब्ध आहे. नवीनतम Lenovo Yoga 9i 13th Gen Intel Core i7 CPU द्वारे Intel Iris Xe ग्राफिक्ससह समर्थित आहे. त्यामुळे जबरदस्त स्पेसिफिकेशन असणारा लॅपटॉप खरेदी करण्याची संधी गमावू नका.

तसेच कंपनीने यामध्ये स्मार्ट फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानासह 2-मेगापिक्सेल फुल-एचडी आणि इन्फ्रारेड वेबकॅम दिला आहे. या लॅपटॉपला चार Bowers & Wilkins स्पीकर्स आणि Dolby Atmos सपोर्टसह 360-डिग्री फिरणारा साउंडबार असून यात काचेच्या टचपॅडसह एज-टू-एज कीबोर्ड आहे.

स्टोरेजचा विचार केला तर, या लॅपटॉपमध्ये 16 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 1 TB पर्यंत SSD स्टोरेज उपलब्ध आहेत. लॅपटॉपमध्ये 75 Wh बॅटरी उपलब्ध आहे, जी 14 तासांपर्यंत फुल एचडी प्लेबॅक सपोर्ट देईल, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, रॅपिड चार्ज बूस्ट फास्ट चार्जिंगच्या मदतीने, 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये दोन तासांचा बॅकअप उपलब्ध असणार आहे.

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ v5.2 वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. दोन USB Type-C Thunderbolt 4.0 पोर्ट, दोन USB Type-C 3.2 Gen 2 पोर्ट, एक USB Type-A Gen 3.2 पोर्ट आणि 3.55mm हेडफोन/माइक कॉम्बो जॅक आहेत. लॅपटॉपचे वजन सुमारे 1.4 किलो इतके आहे.

Ahmednagarlive24 Office