अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-दिवसेंदिवस पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढून येऊ लागला आहे. यातच बिबट्याने पुन्हा एकदा मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवळ असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागू राहिले आहे.
नुकतेच सोनई जवळील बेल्हेकरवाडी शिवारातील बेल्हेकरवस्ती येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला असून अनेकांच्या नजरेत बिबट्या पडला असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेल्हेकरवाडी येथील शेतकरी जनार्दन सूर्यभान बेल्हेकर यांच्या वस्तीवर शेतीच्या बाजूने असलेल्या पाच फूट उचींच्या भिंतीवरून उडी मारत रात्री दोन वाजेच्या दरम्यान बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळीचा फडशा पाडला.
सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांना याबाबत कळविण्यात आले.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तीन दिवसांपूर्वीही या परीसरात एक कालवड ठार झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा,अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.