अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ]राहुरीमधे वनविभागाच्या परिसरात जखमी असलेल्या बिबट्याचा अखेर उपचाराअभावी मृत्यू झाला.वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

माञ बिबट्याचा हा मृत्यू नैसर्गिक असुन वयोवृद्ध झाल्याने झाला अहल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

राहुरी वनविभागाच्या हद्दी पासुन काही अंतरावर असलेल्या राजू सरोदे यांच्या शेतात दोन वर्ष वय असलेला नर जातीचा एक जखमी अवस्थेत असलेला बिबट्या अनेक नागरीकांना पाहिला.

चिंचविहिरे येथील माजी सरपंच शरद पानसंबळ यांनी तात्काळ वनविभागाला सदर घटनेनेची माहीती देऊन या बिबट्याला उपचाराची आवश्यकता असल्याचे सांगितले. तरीदेखील वनविभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

सोमवारी समजलेली माहीती असून देखील मंगळवारी सकाळी १० वाजता बिबट्याच्या उपचारासाठी वन विभागाची टिम दाखल झाली.माञ याच दरम्यान या बिबट्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्या असल्याचा आरोप शरद पानसंबळ यांनी केला आहे. तर सदर बिबट्या वयोवृद्ध झाल्याने झाला असल्याचा दावा वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे यांनी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24