अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच बिबट्याने राहुरी राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूणगी येथील राऊतवाडी परिसरात मध्यवस्तीत बिबट्याने धुमाकूळ एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. दरम्यान तालुक्यातील अंमळनेर येथे ज्ञानदेव जगताप या शेतकर्याच्या शेळीचा नुकताच बिबट्याने फडशा पाडला.
ही घटना ताजी असतानाच पिंपळगाव फूणगी येथील संदिप मेहेत्रे यांच्या दोन शेळ्या बिबट्याने मारल्या आहेत. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून मेहेत्रे यांना मदत मिळवून देणे आश्वासन दिले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पहिले असता भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या शेतकर्यांच्या शेळ्या-मेंढ्या, पाळीव कुत्री, वासरे या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवत आहेत.
बिबट्याची वाढती दहशत पाहता वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.