अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अनेकदा शिकारीसाठी रस्त्यावर आलेले बिबटे हे अनेकदा रस्ते अपघातात ठार झाले आहे. अशीच घटना पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात घडली आहे.
नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.
नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाट, डोळसणे, माहुली घाट या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. अनेकदा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा अपघात होऊन त्यांचा जीव गमाविण्याची वेळ येते.
रविवारी पहाटे असेच काही घडले. दोन वर्षाचा नर बिबट्या रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
सदरची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी वनविभागाला अपघाताची माहिती कळविली. वनविभागाचे वनरक्षक सी.डी. कासार व अरुण यादव हे घटनास्थळी पोहोचले. या मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. शवविचेदन करण्यासाठी मयत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.