पाथर्डी तालुक्यातील ‘या’ परिसरात बिबट्याचे दर्शन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- तालुक्यातील मढी येथील डोंगररांगेत बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

बिबट्या मढी परीसरात आला होता. मात्र तो मच्छिन्द्रनाथ गडाकडे गेल्याचे ठसे मिळाले आहेत. वनविभागाने मढी, शिरापुर व घाटशिरस या भागात लोकांत जागृती केली आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे काम तिसगावच्या वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

मढी, शिरापुर व केळवंडी येथईल तिन बालकांचे प्राण घेणाऱ्या त्या बिबट्याच्या आठवणी ताज्या असतानाच मढी येथील साळवे वस्तीशेजारी बुधवारी सायंकाळी बिबट्या आल्याचे विजय साळवे यांनी पाहीले.

यापूर्वीही बिबट्याने साळवे वस्तीवर हल्ला करुन मुलीचे प्राण घेतलेला आहे. बुधवारी विजय साळवे यांनी बिबट्या पाहीला व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

तिसगाव वपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी साळवे वस्तीवर जाऊन पाहणी केली असता .

त्यांना तेथे बिबट्याचे ठसे आढळुन आले व तो डोंगराच्या दिशेने वरती  गेल्याच्या पाऊल खुणा दिसल्या आहेत. वनविभागाने या भागात पिंजरे लावले आहेत.

मढी, शिरापुर व घाटशिरस या भागात लोकांना याबाबत कल्पना दिली असून, रात्रीच्या वेळी बाहेर पडु नका असे आवाहन केले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24