जिल्ह्यातील ‘या’ गावात बिबट्याची दहशत; परिस्थितीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत आजही कायम आहे. आजवर बिबट्याने अनेकांवर हल्ले करून काहींना जखमी केले आहे तर काहीजणांचा या हल्ल्यात मृत्यू देखील झाला आहे.

आता पुन्हा एकदा बिबट्याने जिल्ह्यातील सुपा परिसरातील गावामध्ये दहशत निर्माण केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील म्हसणे, सुलतानपूर येथे दहा दिवसांपासून एक मादी बिबट्या आपल्या पिलांसह उसात वास्तव्यास असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

दररोज वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करत असून त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती ग्रामस्थानी दिली आहे. गेली दहा दिवसांपासून वाघीण पिलांसह म्हसणे येथील ऊस असलेल्या शेतात दबा धरून बसलेली आहे. रात्रीच्या वेळी ती शिकारीसाठी बाहेर पडते.

आतापर्यंत शेजारील वस्तीवरील दोन शेळ्या या वाघीणीने फस्त केल्या. मादी बिबट्याच्या दहशतीने शेतकरी महिला, मुले याचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. असे असतानाही वनविभाग पिंजरा लावण्यास गंभीर नसल्याने ऐन खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्या काळात शेतकरी हैराण झाले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24