‘या’ ठिकाणी मृत अवस्थेत आढळला बिबट्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. यातच बिबट्याने अनेक तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर अनेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता.

या प्रकारामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती तसेच भीतीचे वातावरण पसरले होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्य झाल्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातच राहाता तालुक्यातील लोणी हनमंतगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या

ब्राह्मणे- बनसोडे वस्ती जवळ शनिवारी (दि.१९) सकाळी ६ वाजेदरम्यान नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

तरी बिबट्या नेमका कशामुळे जखमी झाला, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24