अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे.
जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधातील लसीचा दुसरा डोस गुरुवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला. पंतप्रधान मोदी यांनी एक मार्चला पहिला डोस घेतला होता. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.
देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली होती. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला होता.
तर आज कोरोना लसीचा दुसरा डोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात घेतला आहे. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे. जेव्हा पंतप्रधानांनी पहिला डोस घेतला होता तेव्हा ते म्हणाले होते, “आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला.
आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी.”आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देश कोव्हिडमुक्त करूया असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.