अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- गेल्या आठ दिवसांपासून तनपुरे कारखाना कामगारांचे थकीत पगार प्रश्नी सुरू असलेले आंदोलन सुरू असून कामगारांच्या समर्थनार्थ आरपीआय व शिवसेना यांनी नगर- मनमाड मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले.
जर दोन दिवसात कामगारांचा प्रश्न सोडवला नही तर विखेंच्या घरासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.
गेल्या ८ दिवसापासून तनपुरे कारखाना थकीत पगारप्रश्नी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन दिवसापासून आंदोलन मागे घेण्यासाठी खा.सुजय विखे, माजीमंत्री शिवाजी कर्डीले, संचालक मंडळ व भाजपचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
मात्र सकारात्मक चर्चा न झाल्याने कामगार आंदोलनवर ठाम राहिले. कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघत नसल्याने आरपीआय व शिवसेना यांनी नगर-मनमाड रस्त्यावर उतरून सुमारे तासभर रास्ता रोको केला.
मंगळवार सकाळपर्यंत खा.विखे यांनी योग्य न घेतल्यास विखेंच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा दिला. आंदोलनात आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, कुमार भिंगारे इंद्रभान पेरणे, सचिन काळे,
बाबासाहेब मुसमाडे, भागवत मुंगसे, संतोष चोळके, आरपीआय महिला आघाडीच्या सीमाताई बोरुडे, स्नेहल सांगळे, सुधीर झांबरे, सचिन साळवे, तुषार दिवे, माऊली भागवत आदींसह भीमसैनिक, शिवसैनिक व कामगार सहभागी झाले.