कोरोनाची लढाई ताकदीने जिंकू : आमदार कानडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाचे सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांनी आपल्या घरातील व आसपासच्या लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना केअर सेंटर मध्ये येऊन न घाबरता आपले उपचार घेतले पाहिजेत.

शासन सर्व पातळ्यांवर पूर्ण ताकदीने कोरोनाची लढाई लढत असून ही लढाई जिंकू, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सहारा लॉन्स येथे शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.कानडे बोलत होते.

यावेळी देवळालीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ.आर. शेख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोविंद खामकर,

तालुका आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, प्रशासकीय अधिकारी बन्सी वाळके, सर्कल अधिकारी सतीश कानडे, कामगार तलाठी दीपक साळवे आदी उपस्थित होते.

आमदार कानडे म्हणाले, सौम्य लक्षण असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घरी न थांबता व आपणा संसर्ग इतरांना होऊन देता न घाबरता कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे.

श्रीरामपुर मतदारसंघात येणाऱ्या राहुरी तालुक्यातील ३२ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार असून नाश्‍ता, जेवण व पिण्याचे शुद्ध पाणी रुग्णांना पुरवले जाणार आहे.

चोवीस तास डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली रुग्ण असणार आहेत. त्याच बरोबर ॲम्बुलन्सची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गरज भासल्यास आपण या ठिकाणी ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करणार आहोत.

कोरोनाची चेन तोडण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे.तालुक्यातील टाकळीमिया येथील युवक मोसिन पठाण,

शाकीर पठाण, नसीब पठाण, बापूसाहेब लांडगे यांनी पुढाकार घेऊन या कोरोना केअर सेंटरसाठी रुग्णवाहिका म्हणून मोफत आपली गाडी देण्याचा मानस व्यक्त केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24