अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- संत श्री असारामजी बापु मागील आठ वर्षापासुन जोधपुर कारागृहात बंद आहेत. आसारामजी बापु यांचे वय 84 वर्षे आहे. श्री योग वेदांत सेवा समिती अहमदनगर आसारामजी बापु यांचे कारागृहातील वर्तन अत्यंत चांगले आहे.
आसारामजी बापु यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिम कोर्टाने कोव्हीड-19 च्या पार्श्वभुमीवर कारागृहातील कैदयां बाबतीत दिलेल्या एका आदेशान्व्ये “70 वर्षेवरील विविध व्याधीग्रस्त् कैदी पॅरोलवर मुक्त् करणेत यावे.” असे नमुद केले आहे.
असे असूनही जोधपुर कारागृह प्रशासन कशाची वाट पहाते आहे? देशातील सेलेब्रीटीला वेगळा न्याय आणी संतांना वेगळा न्याय? संजय दत्त् याला केवळ चाहत्यांच्या मागणीवरुन शिक्षेतुन एक वर्ष सुट दिली आहे. सलमान खान याच्या करीता रात्री बारा वाजता कोर्टाचे दरवाजे उघडले आहेत.
आसारामजी बापु हे मात्र हेतुपुरस्स्र बंदिवासात ठेवले आहेत. यामुळे सामान्य् माणसाचा न्याय यंत्रणेवरील विश्वास कमी होताना दिेसतो आहे. सामाजीक न्यायामधे विषमता दिसते आहे.
म्हणुन संत श्री आसारामजी बापु यांचे वय, त्यांना असलेले आजार यांचा सहानुभुती पुर्वक विचार करुन, संत श्री आसारामजी बापु यांना त्वरीत मुक्त् करणेत यावे ही नम्र विनंती.
असे आशयाचे छावा संघटनेने पत्र दिले आहे. या पत्रावर 167 महीलांच्या सहया आहेत. या पत्राच्या प्रती देशाचे पंतप्रधान,राजस्थानचे मुख्यामंत्री यांना देण्यात आल्या आहेत.