LIC : भारीच की!! LIC च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास महिन्याला मिळेल 12 हजार पेन्शन, काय आहे योजना जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC : निवृत्तीनंतरचे (Retirement) आपले आयुष्य चांगले असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance company) LIC आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या (LIC scheme) योजना आणत असते.

यापैकीच एक म्हणजे सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) आहे. या योजनेत (LIC Pension Yojana) तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

एलआयसी सरल पेन्शन योजना ही एकच प्रीमियम योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मुदत ठेवीप्रमाणे लाभ मिळतो. या योजनेत फक्त 40 ते 80 वयोगटातील लोकच गुंतवणूक करू शकतात.

तुम्ही तुमच्या पत्नीसोबतही ही योजना खरेदी करू शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी LIC सरल पेन्शन प्लॅनमध्ये 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. एलआयसी सरल पेन्शन प्लॅनमध्ये, तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन लाभ मिळतात.
LIC सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करताना काही कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, वयाचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट आहे.