Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

LIC : करा फक्त एकदाच गुंतवणूक आणि मिळवा दरमहा 50 हजारांची पेन्शन, काय आहे योजना? पहा

LIC : एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी ऑफर करत असते. अशातच जर तुम्हीही आयुष्यभर कमावण्याचा प्लॅन शोधत असाल तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मिळू शकतात. या योजनेत वयाच्या 40 व्या वर्षापासूनच पेन्शन मिळते. अनेकजण एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करत आहेत. एलआयसीची ही सिंगल प्रीमिअम योजना आहे.

LIC ची ही योजना सिंगल प्रीमियम पेन्शन योजना असून ज्यात पॉलिसी घेत असताना प्रीमियम फक्त एकदाच जमा करावा लागेल. यानंतर त्याचा तुम्हाला फायदा आयुष्यभर मिळेल. समजा, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, नॉमिनीला लाभ देण्यात येतो.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

एलआयसीची सरल पेन्शन योजना ही तात्काळ वार्षिक योजना असल्याने तुम्ही पॉलिसी घेतली की तुम्हाला पेन्शन मिळते. इतकेच नाही तर पॉलिसी घेतल्यानंतर जितकी पेन्शन मिळू लागते, तितकीच पेन्शन आयुष्यभर मिळते.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे कमीत कमी वय 40 वर्षे आणि जास्तीत जास्त 80 वर्षे असावे. यात तूम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. जर तुम्ही ही पॉलिसी घेतली तर, पॉलिसीचे 6 महिने पूर्ण होईपर्यंत पॉलिसी सरेंडर करण्यात येते. या पॉलिसीमध्ये कमीत कमी 1000 रुपये पेन्शन मिळते. म्हणजे याचाच अर्थ असा की या पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान 1000 रुपये पेन्शन मिळेल.

इतका होणार फायदा

एलआयसीची ही पॉलिसी घेत असताना तुमचे वय 40 वर्षे असेल आणि जर तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम घेतला असल्यास तुम्हाला वार्षिक 50250 रुपये मिळू शकतील. तसेच मध्यभागी जमा करण्यात आलेली रक्कम परत करायची असेल तर, जमा केलेल्या रकमेतील 5% वजा करून ती काढता येते.

एलआयसीच्या या पेन्शन योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला त्यावर कर्ज घेता येते. जर तुम्हाला खूप गंभीर आजार असल्यास तुम्हाला त्याच्या उपचारासाठी पैसे घेता येतात. या पेन्शन योजनेसोबत तुम्हाला अत्यंत गंभीर आजारांची यादी देण्यात येते. जर तुम्ही ही पॉलिसी सरेंडर केली तर, तुम्हाला मूळ किमतीच्या 95% परत दिले जातात. तसेच, ही पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यांनंतर, कर्जासाठी अर्ज करता येतो.