LIC Policy : कमाईची संधी! अवघ्या 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 17 लाखांचा परतावा, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : जर तुम्हाला देखील सुरक्षित गुंतवणुकीसह लखपती बनायचे असेल तर एलआयसीची पॉलिसी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. एलआयसी सतत आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त योजना घेऊन येत असते. एलआयसीकडे प्रत्येक वर्गातील लोकांसाठी शानदार योजना आहेत.

एलआयसीची अशीच एक योजना जीवन लाभ आहे, ज्यात आता तुम्हाला प्रतेय्क महिन्याला फक्त 233 रुपये जमा करावे लागणार आहेत. तुम्ही परताव्यावेळी 17 लाखांचा मोठा फंड जमा करू शकता. जर तुम्हीही अजून एलआयसीच्या या शानदार योजनेत गुंतवणूक केली नसेल तर आजच या योजनेत सहभागी व्हा.

एलआयसीच्या योजनेचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा आणि शेअर बाजाराचा काहीही संबंध नाही. शेअर बाजारातील तुमच्या पैशावर कसलाच परिणाम होत नाही. एकंदरीतच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. ही मर्यादित प्रीमियम योजना असून ही योजना मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्ता लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

जाणून घ्या पॉलिसीची खासियत

आनंदाची बाब म्हणजे एलआयसीची ही शानदार पॉलिसी फायदे आणि सुरक्षितता दोन्ही देत आहे. 8 ते 59 वयोगटातील लोकांना या पॉलिसीचा लाभ घेता येतो. या पॉलिसीचा कालावधी 16 वर्षे ते 25 वर्षांचा असून तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयांचे आश्वासन घ्यावे लागणार आहे.

शिवाय तुम्ही जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकता यावर मर्यादा नसते. तर त्याच वेळी, तुम्ही या योजनेत एकूण 3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर, तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळेल. इतकेच नाही तर या पॉलिसीमध्ये टॅक्स बेनिफिटसोबत डेथ बेनिफिटही एलआयसीकडून आपल्या गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू पॉलिसी काळात झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम जमा केल्यास त्याच्या नॉमिनीला मृत्यूनंतर विमा रक्कम, सिंपल रिवर्सनरी बोनस आणि फायनल एडिशन बोनस दिला जातो. नॉमिनीला अतिरिक्त विमा रक्कम एलआयसीकडून दिली जाते.