LIC Policy : LIC च्या करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने सुरु केली ही विशेष सुविधा; जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा

LIC Policy : देशात करोडो लोक LIC मध्ये गुंतवणूक करत असतात. यातून त्यांना चांगला परतावा मिळतो. त्यामुळे जर तुम्हीही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर आता तुम्हाला कंपनीकडून विशेष सुविधा दिली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी Whatsapp सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे आता तुम्ही घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

कंपनीच्या अध्यक्षांनी दिली माहिती

Advertisement

एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री एम.आर. कुमार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉलिसीधारक आता फक्त त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतील. कंपनीने अनेक संवादात्मक सेवा सुरू केल्या आहेत. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या फोनवरच अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकाल.

हा नंबर फोन मध्ये सेव्ह करून SMS करा

या सुविधेचा लाभ फक्त अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांनी पोर्टलवर आपली पॉलिसी नोंदणी केली आहे. ग्राहकांना या फोन नंबर 8976862090 वर फक्त हाय पाठवायचे आहे. यानंतर, तुम्हाला पॉलिसी सेवांशी संबंधित सर्व माहिती घरी बसून मिळेल.

Advertisement

या सुविधा LIC Whatsapp वर उपलब्ध असतील.

तुम्हाला तुमच्या पॉलिसी प्रीमियमची देय तारीख आणि बोनसशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
तुम्ही युलिप पॉलिसीच्या युनिट्सचे स्टेटमेंट देखील पाहू शकाल.
याशिवाय कर्जाची पात्रता आणि हप्त्यांशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असेल.
पॉलिसी प्रीमियम पॅड प्रमाणपत्राबाबतही तपशील मिळतील.
यासोबतच तुम्हाला एलआयसी सर्व्हिस लिंकसारख्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

पोर्टलवर नोंदणी करावी लागेल

Advertisement

एलआयसी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक आणि इतर महत्त्वाचे तपशील भरावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप सुविधेचा लाभही घेता येणार आहे.