LIC Policy : देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी एलआयसी प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी पॉलिसी आणत असते. कंपनीची पॉलिसी सर्वांना परवडते. कारण ती बजेटमध्ये येते. त्याशिवाय कंपनीच्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला शानदार परतावा मिळतोच.
तसेच गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. एलआयसीने अशीच एक योजना आणली आहे. जिचे नाव आधार शिला योजना असे आहे. खास महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अवघ्या 58 रुपयांच्या गुंतवणुकीवर 8 लाख रुपये मिळतील.
LIC ची आधार शिला योजना ही गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला एक सुविधा म्हणून आर्थिक आधार देते. जर तुम्ही योजना खरेदी केली आणि जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीचे सर्व पैसे गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला मिळतात. तर दुसरीकडे, पॉलिसी धारक टिकून राहिला तर, त्याला मॅच्युरिटीमध्ये शानदार परतावा मिळतो. इतकेच नाही तर या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
जाणून घ्या अटी
जर तुम्हाला ही योजना सुरु करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असावे. तसेच 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील नागरिकांना ही पॉलिसी घेता येते. गुंतवणूकदारांना या पॉलिसीमध्ये वार्षिक, त्रैमासिक, सहामाही आधारावर प्रीमियम जमा करता येतात. तसेच या पॉलिसीमध्ये 10 वर्षे ते 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याची तरतूद केली आहे. समजा पॉलिसी धारकाने पॉलिसी घेतली आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली तर, पॉलिसीधारकाला गुंतवणुकीच्या रकमेच्या 80% रक्कम देण्यात येते.
असे मिळतील 8 लाख रुपये
एलआयसीकडून ही पॉलिसी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये 30 वर्षांत दररोज 58 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच जर तिने एका वर्षात 21,918 रुपये गुंतवले, तर ती 20 वर्षांत 4,29,392 रुपये गुंतवते. यानंतर म्हणजे 20 वर्षांनंतर, परिपक्वतेवर 7,94,000 रुपयांचा निधी तयार करण्यात येतो. ज्यांच्याकडे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.