LIC : ‘ही’ योजना तुम्हाला करेल मालामाल! फक्त एकदाच पैसे गुंतवून मिळवा महिन्याला 36,000 रुपयांची पेन्शन
LIC : सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे म्हणजेच LIC कडे प्रत्येक वयोगटासाठी पॉलिसी असते. LIC कडे अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या योजनेचाही फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे.
यापैकी अशीच एक योजना म्हणजे LICची जीवन अक्षय पॉलिसी होय. या योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला 36,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही थोड्याच दिवसात श्रीमंत होऊ शकता.
LIC जीवन अक्षय पॉलिसी ही वैयक्तिक वार्षिकी प्लॅन आणि सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग योजना आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी रु 1 लाख गुंतवू शकता, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा सेट करण्यात आली नाही.
तर दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसीमध्ये कमीत कमी 1 लाख रुपये गुंतवले तर व्यक्तीला 12,000 रुपये पेन्शन मिळेल. इतकेच नाही तर पॉलिसीधारक त्यांच्या आवडीनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. हे लक्षात घ्या की पेन्शनची रक्कम गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असते.
जाणून घ्या पात्रता
या योजनेतील पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर, या योजनेत 35 वर्षे ते 85 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तसेच दिव्यांग व्यक्तींना या योजनेत लाभ घेता येतो. तसेच या पॉलिसीची खासियत म्हणजे पेन्शनच्या रकमेनुसार त्यानुसार तुम्ही गुंतवणूकही करू शकता.
असे मिळवा 36 हजार रुपये
तुम्हाला यामध्ये 36 हजार रुपये पेन्शन मिळेल. जर एखादी व्यक्ती 45 वर्षांची असल्यास त्याने ही योजना निवडून यात 71 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला दरमहा 36,429 रुपये पेन्शन मिळेल. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर त्यांची ही पेन्शन बंद होईल.