काही मिनिटांत ‘ह्या’ सोप्या मार्गाने ड्रायव्हिंग लाइसेंस आधारशी करा लिंक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- आधार कार्ड हे भारतामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे.

बर्‍याच सरकारी योजनांशी संबंधित असल्याने ते एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी नियमांनुसार भारतातील प्रत्येक नागरिकाने आधार काही महत्त्वाच्या कागदपत्रांशी जोडणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, आयकर विवरणपत्र भरत असताना आधार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधारशी जोडले जाऊ शकतात.

आधार ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडणे खूप सोपे आहे :- तुम्ही तुमचे आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे कारण ड्रायव्हिंग लायसन्सशी आधार जोडणे खूप सोपे झाले आहे.

जे बनावट परवाने तयार करतात त्यांना डीएल-आधार लिंकद्वारे बंदी घातली जाऊ शकते. आतापर्यंत शासनाने वाहन चालविण्याचा परवाना आणि आधार जोडणे बंधनकारक केले नाही.

परंतु तरीही सुरक्षिततेसाठी दोन्ही लिंक ठेवणे चांगले होईल, ड्राइविंग लाइसेंस-आधार लिंक मुळेही मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आपण आपला ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी कसा जोडू शकता याविषयी माहिती पाहुयात –

लिंक करण्याची ही आहे संपूर्ण प्रक्रिया

  • – सर्व प्रथम sarathi.parivahan.gov वेबसाइटवर जा.
  • – आपले राज्य निवडा .
  • – त्यानंतर एक विंडो उघडेल.
  • – विंडोच्या उजव्या बाजूला मेनूबारमधील Apply Online वर क्लिक करा.
  • – त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (नूतनीकरण / डुप्लिकेट / एडल / इतर) वर क्लिक करावे लागेल.
  • – एक नवीन विंडो उघडेल, तेथून आपल्याला राज्याचा तपशील द्यावा लागेल.
  • – राज्य निवडल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
  • – त्यानंतर आधार कार्डशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
  • – शेवटी, आपल्याला प्रोसीड वर क्लिक करावे लागेल.
  • – आता ड्रायव्हिंग लाइसेंस विषयी संपूर्ण माहिती मिळेल, त्या खाली मोबाइल नंबर आणि आधार कार्डचा पर्याय दिसेल.
  • – आधार क्रमांक आणि ओटीपी नंबर भरावा लागेल. आपले डीएल अपडेट होईल
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24