जबरदस्त लूक, शानदार सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 7 सीटर एसयूव्हींची लिस्ट, किंमतही अगदी बजेटमध्ये

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्या मार्केटमध्ये सेवन सीटर गाड्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. या आधी छोटी, चार चित्र कार लोक खरेदी करायचे परंतु आता सेवन सीटर वाहनांना जास्त मागणी आली आहे. फायनान्स सुविधा, वहडते कुटुंब आदी कारणांमुळे या कार जास्त पसंत केल्या जात आहेत.

विशेष म्हणजे या सेवन सीटर वाहनांमध्ये आरामदायी सीट आणि प्रभावी सेफ्टी फीचर्स देखील असतात. पाहताना या कार एकदम रिच वाटतात. जर तुम्ही देखील सेवन सीटर कार घेण्याच्या विचारात असाल तर येथे आम्ही तुम्हाला सेवन सीटर एसयूव्ही कि ज्यांची किंमत अगदी बजेटमध्ये आहे अशा वाहनांची माहिती देणार आहोत.

पहिल्या क्रमांकावर आहे Maruti एर्टिगा

Maruti एर्टिगा ही मोठ्या फॅमिली असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. ही सेव्हन सीटर कार प्रचंड लोकप्रिय आहे. याची किंमत 8.64 लाखांपासून सुरु होते. विशेष म्हणजे यात CNG ऑप्शन देखील दिला आहे. या एसयूव्हीमध्ये 1462 cc इंजिनअसून 209 लीटरची बूट स्पेस आहे. ही फॅमिलीसाठी एकदम जबरदस्त कार आहे.

Maruti Ertiga

यात दुसऱ्या क्रमांकावर येते Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N ही एक सेवन सतार मधील शानदार एसयूव्ही आहे. ही कार 13.26 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही ऑप्शन आहेत. यामध्ये 1997 cc आणि 2184 cc असे दोन पॉवरफुल इंजिन आहेत. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येत असून यात सेफ्टी फिचर म्हणून एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, स्टेबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट असे सेफ्टी फीचर्स आहेत. ही कार देखील तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रिय आहे.

Mahindra Scorpio N

सगळ्यात भारी टाटा सफारी

तरुणांमध्ये असे म्हटले जाते की, सगळ्यात भारी टाटा सफारी ! या कारमध्ये डिझेल इंजिन उपलब्ध आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. इंजिनचा विचार कराल तर यात 1956 सीसी इंजिन आहे. याची किंमत जरा जास्त आहे पण एसयूव्ही बाकी एसयूव्ही आहे. याची प्रारंभिक किंमत 16.19 लाख रुपये आहे.ड्रॉयव्हरसाठी 360-डिग्री कॅमेरा आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 5 स्टार रेटिंग मिळालय. त्यामुळे ही एकदम सेफ्टी कार आहे.

Tata Safari
Ahmednagarlive24 Office